औरंगाबाद : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरण आणि विलीनीकरण याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे सरकारी बँकांचे कामकाज ठप्प आहे. आज औरंगाबाद शहरात सहा ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. याविषयी देवीदास तुळजापूरकर यांनी माहिती दिली. तसेच सार्वजनिक बॅंकांच्या खाजगीकरणाला विरोध केला. (व्हिडिओ : सचिन माने)